शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

सुतोंडा (नायगावचा किल्ला)

सुतोंडा (नायगावचा किल्ला )
1 मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्राच्या आणि मराठी मनाचा अभिमानाचा दिवस, महाराष्ट्राला लाभलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक,नैसर्गिक वारसा खूप मोठा आहे. आणि महाराष्ट्र दिनाच औचित्त्य साधून सुतोंडा किल्ल्यावर जायच अस मी 30 तारखेला ठरवल मित्राणा फोन पन झाले पन सगळ्यांचे वेगळेच प्लान ठरलेले मग काय जायच तर होतच आणि आणि एकत्यानेच हा सोलो ट्रेक करायच ठरल
ऊन खूप आहे म्हणून सकाळी लवकरच जायचा पालन केला. आणि सकाळी 5 ला उठून प्रवासाला सुरुवात झाली. ट्रेक पार्टनर माझी बाईक.
 पायथ्यापासून दिसणारा नायगावच्या किल्ला 

सुतोंडा हा किल्ला औरंगाबाद पासून 120 km अजिंठा सातमाळ डोंगररांगेत असणारा सुतोंडा, सायीतोडा, वाडी किल्ला, वाडीसुतोंडा किल्ला, नायगांव किल्ला, वाडी किल्ला या नावांनी परिसरात ओळखला जातो. किल्ला आताच्या स्थितीत जरी दुर्लक्षित असला तरी किल्ल्यावरील इमारती,वाड्याचे अवशेष,बुरुज,कोरीव पाण्याचे टाके,किल्ल्यावरील ढासलेले दरवाजे,किल्ल्यावरील लेणी आजही तग धरून इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. किल्ल्याचे पायथ्याचे गाव नायगाव आहे. 
किल्ल्यावरील लेणी 
1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी मी या किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो एकटा असल्याने आणि किल्ल्यावरील आदबाजूची लेणी बघण्यासाठी म्हणून गावातून एक वाटाड्या सोबतीला घेतला गावातुन 15 मीन. च्या अंतरावर किल्ला लागतो. आम्ही आधी लेणी बघणाच्या उद्देशाने चोर दरवाच्या च्या बाजूने गेलो. अर्ध्या वर किल्ला चढल्यानंतर एक लेणी दिसते, जोगवा मागणारीच लेणी अस या लेणीच नाव मी वाचल होत पण गावकरी त्या लेणीला जोगणा मांगीनच घर किंवा लेणी अस म्हणतात अस तो वाटाड्या सांगत होता. 

किल्ल्यावरील मशिदीची  इमारत आणि  पाण्याचे टाके 
जैन लेणी असून लेणीच्या मागच्या बाजूस कोरीव काम असून लेणीच्या बाहेरील बाजूस दोन मुर्त्या बघायला मिळतात. वरच्या बाजूस जैन महावीराची प्रतिमा कोरलेली दिसते. लेणी पाहून आम्ही तिथूनच वर किल्ल्यावरील चोर दरवाज्याने किल्ल्यावर पोहचलो. चोर दरवाज्याच्या बाजूच्या भिंती पडल्या असून फक्त चोर दरवाचा तेवढा शिल्लक आहे. तेथूनच उजव्या बाजूस किल्ल्यावरील इमारतीचे अवशेष पाहायला मिळतात तसेच किल्याची लांबून दिसणारी तटरक्षक भिंत ही पाहायला मिळते. ती पाहुन परत चोरदरवाज्याच्या डाव्या बाजूस दिसणारा किल्ल्यावरील एकमेव शाबूत बुरुज पाहायला मिळतो. 
पाण्याचे टाके 
बुरुज पाहून वर गेलं की किल्ल्यावरील मशिदीची पडकी इमारत पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला दोन पिराच्या कबरी आहेत आणि त्याच्या समोरच एक 20 ते 25 कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांचा समूह दिसतो. या टाक्यांमध्ये पाणी नाहीए. या पाण्याच्या टाक्या पाहून डाव्या बाजूने वरच्या दिशेष आणखी काही इमारतीचे अवशेष पाहायला मिळतात. तिथूनच पुढे आणखी काही कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. मी पाहिलेल्या औरंगाबाद च्या किल्ल्या पैकी सगळ्यात जास्त पाण्याच्या कोरीव टाक्या असणारा हा एकमेव किल्ला आहे. ते पाहून आणखी डाव्या बाजूने खालच्या अंगाला 6 ते 7 खांब असणार अंदाजे 25 ते 30 फूट कोरीव प्रशस्त पाण्याचं टाक पाहायला मिळत या टाक्यात भरपूर पाणी आहे. 
किल्ल्यावरील  पाण्याचे टाके  
ते  टाक पाहून समोरच काही अंतराच्या पायवाटेवर आणखी एक  12 कोरीव खांब असणार तीन भाग असणार पाण्याच प्रशस्त टाक पाहायला मिळत याच टाक्याच्या आतील भागात आणखी एक कोरीव टाक पाहायला मिळत या टाक्यात पाणी असलं तरी पाणी पिण्या योग्य नाहीए,गावातील लोक या टाकीस सीताची नहानी म्हणतात. तेथून डाव्या बाजूस आणखी एक 13 तुटलेल्या खांबाच कोरीव पाण्याचं टाक पाहायला मिळत या टाक्यातील पाणी स्वच्छ असून ते पाणी पिण्यायोग्य आहे. 
कातळात कोरलेले  किल्ल्याचे द्वार 
टाक्याच्या डाव्या बाजूस एक दगडी खिडकी आहे. हे टाक पाहून आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाच्या कडे गेलो दरवाचा पूर्ण ढासळलेल्या स्थितीत आहे. याच दरवाज्यातून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली असता कातळ कोरून एक खिंड केलेली पाहायला मिळाते. खिडीतून आणखी बाहेर जाताना काटकोनात बसवलेले प्रवेश द्वार पाहायला मिळतात. तेथून बाहेर आला की ही किल्ल्याची मुख्य प्रवेशद्वाराची बाजू पाहायला मिळते पूर्ण डोंगर तोडून हे मुख्य द्वार तयार केलेले दिसते. कातळभिंतीच्या वर दगडी तटबंदी आहे त्याच्या वरच डाव्या बाजूस शरभ शिल्प कोरलेले पाहायला मिळते. या बाजूने डोंगराला वेढा घालून मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यावर जाण्यासाठी सोपा रस्ता आहे पण आम्ही लेणी बघण्यासाठी चोरवाटेच्या मार्गाने किल्ल्यावर गेलो हा रस्ता चढायला अवघड आहे.
विष्णूची मूर्ती 

गावातील एक झाडाखाली ठेवलेली विष्णूची एक जुनी मूर्ती पहायला मिळते ही मूर्ती गावातील एका शेतात सापडलेली आहे अस मला त्या गावातील व्यक्तीने सांगितल मूर्ती काढतानाच तिचा एक हात तुटला होता आणि आताच्या स्थितीत ही मूर्ती खूप दुर्लक्षित आहे.

सुतोंडा (नायगावचा किल्ला)

सुतोंडा (नायगावचा किल्ला ) 1 मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्राच्या आणि मराठी मनाचा अभिमानाचा दिवस, महाराष्ट्राला लाभलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक...