शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

सुतोंडा (नायगावचा किल्ला)

सुतोंडा (नायगावचा किल्ला )
1 मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्राच्या आणि मराठी मनाचा अभिमानाचा दिवस, महाराष्ट्राला लाभलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक,नैसर्गिक वारसा खूप मोठा आहे. आणि महाराष्ट्र दिनाच औचित्त्य साधून सुतोंडा किल्ल्यावर जायच अस मी 30 तारखेला ठरवल मित्राणा फोन पन झाले पन सगळ्यांचे वेगळेच प्लान ठरलेले मग काय जायच तर होतच आणि आणि एकत्यानेच हा सोलो ट्रेक करायच ठरल
ऊन खूप आहे म्हणून सकाळी लवकरच जायचा पालन केला. आणि सकाळी 5 ला उठून प्रवासाला सुरुवात झाली. ट्रेक पार्टनर माझी बाईक.
 पायथ्यापासून दिसणारा नायगावच्या किल्ला 

सुतोंडा हा किल्ला औरंगाबाद पासून 120 km अजिंठा सातमाळ डोंगररांगेत असणारा सुतोंडा, सायीतोडा, वाडी किल्ला, वाडीसुतोंडा किल्ला, नायगांव किल्ला, वाडी किल्ला या नावांनी परिसरात ओळखला जातो. किल्ला आताच्या स्थितीत जरी दुर्लक्षित असला तरी किल्ल्यावरील इमारती,वाड्याचे अवशेष,बुरुज,कोरीव पाण्याचे टाके,किल्ल्यावरील ढासलेले दरवाजे,किल्ल्यावरील लेणी आजही तग धरून इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. किल्ल्याचे पायथ्याचे गाव नायगाव आहे. 
किल्ल्यावरील लेणी 
1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी मी या किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो एकटा असल्याने आणि किल्ल्यावरील आदबाजूची लेणी बघण्यासाठी म्हणून गावातून एक वाटाड्या सोबतीला घेतला गावातुन 15 मीन. च्या अंतरावर किल्ला लागतो. आम्ही आधी लेणी बघणाच्या उद्देशाने चोर दरवाच्या च्या बाजूने गेलो. अर्ध्या वर किल्ला चढल्यानंतर एक लेणी दिसते, जोगवा मागणारीच लेणी अस या लेणीच नाव मी वाचल होत पण गावकरी त्या लेणीला जोगणा मांगीनच घर किंवा लेणी अस म्हणतात अस तो वाटाड्या सांगत होता. 

किल्ल्यावरील मशिदीची  इमारत आणि  पाण्याचे टाके 
जैन लेणी असून लेणीच्या मागच्या बाजूस कोरीव काम असून लेणीच्या बाहेरील बाजूस दोन मुर्त्या बघायला मिळतात. वरच्या बाजूस जैन महावीराची प्रतिमा कोरलेली दिसते. लेणी पाहून आम्ही तिथूनच वर किल्ल्यावरील चोर दरवाज्याने किल्ल्यावर पोहचलो. चोर दरवाज्याच्या बाजूच्या भिंती पडल्या असून फक्त चोर दरवाचा तेवढा शिल्लक आहे. तेथूनच उजव्या बाजूस किल्ल्यावरील इमारतीचे अवशेष पाहायला मिळतात तसेच किल्याची लांबून दिसणारी तटरक्षक भिंत ही पाहायला मिळते. ती पाहुन परत चोरदरवाज्याच्या डाव्या बाजूस दिसणारा किल्ल्यावरील एकमेव शाबूत बुरुज पाहायला मिळतो. 
पाण्याचे टाके 
बुरुज पाहून वर गेलं की किल्ल्यावरील मशिदीची पडकी इमारत पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला दोन पिराच्या कबरी आहेत आणि त्याच्या समोरच एक 20 ते 25 कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांचा समूह दिसतो. या टाक्यांमध्ये पाणी नाहीए. या पाण्याच्या टाक्या पाहून डाव्या बाजूने वरच्या दिशेष आणखी काही इमारतीचे अवशेष पाहायला मिळतात. तिथूनच पुढे आणखी काही कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. मी पाहिलेल्या औरंगाबाद च्या किल्ल्या पैकी सगळ्यात जास्त पाण्याच्या कोरीव टाक्या असणारा हा एकमेव किल्ला आहे. ते पाहून आणखी डाव्या बाजूने खालच्या अंगाला 6 ते 7 खांब असणार अंदाजे 25 ते 30 फूट कोरीव प्रशस्त पाण्याचं टाक पाहायला मिळत या टाक्यात भरपूर पाणी आहे. 
किल्ल्यावरील  पाण्याचे टाके  
ते  टाक पाहून समोरच काही अंतराच्या पायवाटेवर आणखी एक  12 कोरीव खांब असणार तीन भाग असणार पाण्याच प्रशस्त टाक पाहायला मिळत याच टाक्याच्या आतील भागात आणखी एक कोरीव टाक पाहायला मिळत या टाक्यात पाणी असलं तरी पाणी पिण्या योग्य नाहीए,गावातील लोक या टाकीस सीताची नहानी म्हणतात. तेथून डाव्या बाजूस आणखी एक 13 तुटलेल्या खांबाच कोरीव पाण्याचं टाक पाहायला मिळत या टाक्यातील पाणी स्वच्छ असून ते पाणी पिण्यायोग्य आहे. 
कातळात कोरलेले  किल्ल्याचे द्वार 
टाक्याच्या डाव्या बाजूस एक दगडी खिडकी आहे. हे टाक पाहून आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाच्या कडे गेलो दरवाचा पूर्ण ढासळलेल्या स्थितीत आहे. याच दरवाज्यातून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली असता कातळ कोरून एक खिंड केलेली पाहायला मिळाते. खिडीतून आणखी बाहेर जाताना काटकोनात बसवलेले प्रवेश द्वार पाहायला मिळतात. तेथून बाहेर आला की ही किल्ल्याची मुख्य प्रवेशद्वाराची बाजू पाहायला मिळते पूर्ण डोंगर तोडून हे मुख्य द्वार तयार केलेले दिसते. कातळभिंतीच्या वर दगडी तटबंदी आहे त्याच्या वरच डाव्या बाजूस शरभ शिल्प कोरलेले पाहायला मिळते. या बाजूने डोंगराला वेढा घालून मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यावर जाण्यासाठी सोपा रस्ता आहे पण आम्ही लेणी बघण्यासाठी चोरवाटेच्या मार्गाने किल्ल्यावर गेलो हा रस्ता चढायला अवघड आहे.
विष्णूची मूर्ती 

गावातील एक झाडाखाली ठेवलेली विष्णूची एक जुनी मूर्ती पहायला मिळते ही मूर्ती गावातील एका शेतात सापडलेली आहे अस मला त्या गावातील व्यक्तीने सांगितल मूर्ती काढतानाच तिचा एक हात तुटला होता आणि आताच्या स्थितीत ही मूर्ती खूप दुर्लक्षित आहे.

रविवार, २३ डिसेंबर, २०१८

सोनेरी महाल - Soneri Mahal

परीक्षा संपली आणि कॉलेज ला एका  महिन्याची सुट्टी जरी मिळाली असली तरी मी ऑफिस च्या बदललेल्या वेळेमुळे ईच्छा असुनहि कुठेच जाऊ शकत नव्हतो आणि एका शुक्रवारच्या मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर वापर करण्यासाठी म्हणून रूम पासून काहीच अंतरावर असणाऱ्या सोनेरी महाल हि ऐतिहासिक वास्तू  बघायचा विचार माझ्या मनात आला आणि आणि त्या पुढच्या अर्ध्या तासात मी सोनेरी महालापाशी  होतो. 
प्रवेशव्दार (हाथीखाना )
औरंगाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या परिसरात आहे. महालाच्या आतील नक्षी,आणि चित्र सोन्याच्या पाण्याने रंगववाल्याने या वस्तूला सोनेरी महाल हा हे नाव प्राप्त झाले. औरंगाबाद मधील अनेक मौल्यवान ऐतिहासिक वास्तू पैकी एक असणारी हि वास्तू  बीबी का मकबरा मकबऱ्यापासून काहीच अंतरावर असली तरी इथं पर्यटकांची गर्दी जरा कमीच दिसते. ही वास्तु आता महाराष्ट्र पुरातत्व खात्याच्या अधीन असून प्रवेश शुल्क ३ रु. प्रति व्यक्ती आकारण्यात येते. 
सोनेरी महालाचे प्रवेशव्दाराचे दगडी असून भारदस्त आणि आजही भक्कम आहे, या व्दारास हाथीखाना असे म्हणतात. प्रवेशव्दारातून आत जाताच आपल्यलाला सोनेरी महाल आणि महालाची  शोभा वाढवणारी महालाच्या मागच्या बाजूने असणारी गोगाबाबा टेकडी दिसते. तर पुरातत्व विभागाने लावलेला सोनेरी महालाची माहिती देणारा फलक मला पहा मला पहा जणू असंच बोलतो.. त्या फलकावरील काही माहिती 
Soneri mahal,Aurangabad
प्रवेशव्दारातून आत जाताच दिसणार सुंदर दृश्य 
" औरंगजेबासोबत दख्खनमध्ये आलेल्या बुंदेलखंडातील सरदारने हा महाल बांधला. काही उपलब्ध पुराव्यांवरून असे कळते की शहाजहानने पहाडसिंग व झुंजारसिंग या दोन भावांना दख्खनला पाठवले होते. औरंगजेबाच्या काळात वेळोवेळी पराक्रम गाजवून पहाडसिंगने मुघल साम्राज्याला आपली निष्ठा दाखवून दिली. पुढील काळात त्याने औरंगाबाद येथील सोनेरी महालात वास्तव्य केले. या पुराव्याला अजून एक आधार असा की, सोनेरी महालाच्या बाहेर पहाडसिंगचा सावत्र भाऊ लाला हरदौल यांचे स्मृतिस्मारक आहे.
सोनेरी महाल हे स्मारक इ.स. १६५१ ते १६५३ च्या दरम्यान बांधले गेले असावे. ही इमारत बांधण्यासाठी त्यावेळी ५०,००० रुपये खर्च आला होता. १९३४ साली मूळ किंमतीचा अंदाज घेऊन हैदराबाद संस्थानाच्या तत्कालीन निजामाने हा महाल ओरछाच्या सवाई महेंद्र वीरसिंहदेव बहादुर यांच्याकडून २६,४०० रुपयांना विकत घेतला."
Soneri mahal,Aurangabad
सोनेरी महल 
मुख्य प्रवेशव्दारातून महालाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस बाग आहे तर रस्त्याच्या मधोमध लांबच लांब असा पाण्याचा पाण्याचा जलाशय दिसतो.
सोनेरी महालाच्या मुख्य चोथऱ्यावर जाण्या साठी पायऱ्या आहेत आणि त्यांचंच दोन्ही बाजूस दोन तोफा ठेवलेल्या आहेत तर चोथऱ्यावर तीन वेगवेगल्या प्रकारच्या तोफा बघायला मिळतात. 
या महालात आता वास्तू संग्रहालय सुद्धा आहे. मराठवाड्यातुन विविध ठिकाणावरून आणलेल्या मुर्त्या,वस्तू आपल्याला बघायला मिळतात. महालाच्या आत शिरताच प्रवेशशुल्क भरून उजव्या बाजूस लाकडी फळीवरील चित्रांच दालन आहे. यामध्ये  कृष्ण,राम महादेव,नेसर्गिक,झाड,फुल पक्षी याच्या पेंटिंग्स चा समावेश आहे. सगळी चित्र १७ व्या ते १८ व्या शतकातील आहेत, याच दालनाच्या पुढे काचेवरील चित्रांच दालन आहे. 
सोनेरी महलापासुन दिसणार हाथीखाना 

त्याच्या समोर आपल्याला सोनेरी महालातील मुख्य आणि या महालाचा मुख्य भाग बघायला मिळतो. महालातील सोनेरी रंगातील सुंदर नक्षी आणि मुघल स्थापत्य कलेचा नमुना असणाऱ्या कमानी बघायला मिळतात. हे बघून पुढं गेलं कि तांब्याच्या विविध वस्तू आणि मुर्त्या बघायला मिळतात. त्याच्या पुढे असणार दगडी शिल्पाचं दालन तर लक्ष वेधून घेत. या दालनातील काळ्या कातळातील शिल्प औढा ,हिंगोली येथील असून मला बाकी शिल्प जालना,सिल्लोड,चारठाणा, नगर, उस्मानाबाद येथील आहेत. यामधील चामुंडा देवीचे शिल्प मला अधिक आकर्षक वाटले. हे शिल्प परळी वेजेनाथ येथून आणले असून मूर्तीवरील नाजून काम विलोभनीय आहे.  विविध भाषेतीत शिलालेख सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. या दालनाच्या मधोमध एक लाकडी त्रिमुखी गणेशा बघायला मिळतात. डाव्या बाजूस विविध प्रकारच्या लहान लहान तोफांच दालन असून यामध्ये बंदुकीच्या आकाराच्या तोफा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाने एक वेळ नक्की या वास्तू भेट द्यायलाच हवी... 
शेवटी जाताना घेतलेला एक फोटो 
                                              

शनिवार, १२ मे, २०१८

ऐंशी दिवसात जगाची सफर

एका अनाथालयाला भेटम्हणून पुस्तक द्यायची ठरल. दुकानात गेलो आणि पुस्तक बघत असताना ऐंशी दिवसात जगाची सफर हे पुस्तक हातात पडल. कॉलेजला मिळालेल्या सुट्टीचा उपयोग म्हणून पुस्तक वाचायला घेतल आणि एका बैठकीत वाचून काढल.  
ही गोष्ट आहे 19 व्या शतकातील 80 दिवसात जगाची सफर करता येते का या गोष्टी वर क्लब मध्ये 4 मित्रांमध्ये लागलेली पैज आणि त्यावर लागलेले फॉग (नायक) चे वीस हजार पौंड.
फॉग आपल्या नोकराला घेणून प्रवासाला निघतो त्याच काळात लंडन मधून 55 हजार पौंडची चोरी झालेली असते चोराला पकडणार्याला 4 हजार पौंड च बक्षीस असत. 4 हजार पौंड च्या हव्यासाने गुप्त पोलीस फिक्स ला चोराच मिळालेल वर्णन फॉग सोबत मिळत जुळत वाटत आणि चालू होतो चोर पोलिसांचा पाठलागाचा खेळ. लंडन ते सुएझ आगगाडी आणि सुएझ ते मुंबई जहाज असा प्रवास होतो. मुंबईला आल्यानंतर फॉग चा नोकर पॅसेपाटू्ट देवळांमध्ये चपला घालून जातो पुजाऱ्यांचा मार खातो व कसा बसा रेल्वे गाठतो. चालू होतो मुंबई ते कोलकाता प्रवास पण गाडी अचानक अलाहाबाद च्या अलीकडे थांबते व कळत की गाडी इथून पुढं जात नाही त्यावर फॉग ला नाईलाजाने तिथून एक हत्ती प्रवासासाठी 2 हजार पौंड देऊन विकत घ्यावा लागतो. अलाहाबाद वरून कोलकात्याला गाडी असते . हत्ती वरून जात असताना
एक भारतीय महिला आवडा त्यांना दिसते तिला काही ब्राम्हण तिच्या पतीच्या चितेवर जाळण्यासाठी नेत असतात त्याठिकाणी फॉग आपल्या नोकरांच्या मदतीने आवडा ला वाचवतो आणि अलाहाबाद येथून कोलकाता साठी गाडी पकडतात. कोलकाता ला गेल्या नंतर फिक्स चतुराईने मंदिनातील चपल घालून गेल्याच्या खटल्यात फॉग त्याच्या नोकराला पकडायला लावतो व न्यायाधीशासमोर हजर करतो फॉग तिथून 1000 पौंड देऊन सुटका करून घेतो. आवडाला भारतामध्ये कुठेही ती राहिली तरी तिचा जीव घेतल्याशिवाय इथला समाज तिला सोडणार नाही. म्हणून तिला सोबत हॉंगकॉंग ला तिच्या काका कडे सोडण्या साठी नेतात पण तिथं गेल्या नंतर कळत की काका आता इथे राहत नाही एकटीला कुठं सोडाव म्हणून फॉग तिला सोबत लंडन ला नेण्याच ठरवतो. हॉंगकॉंग ला पोहचल्या नंतर नोकराला जहाजाची तिकिटे काढायला पाठवतो व त्याच वेळी फॉग ला पकडण्यासाठी आलेला फिक्स गुप्त पोलीस फॉग ची जहाज चुकवण्यासाठी पॅसेपाटूट ला मद्य पाजून बेशुद्ध करतो. फॉग च जहाज चुकत व आता त्याला शांघाय ला जाण्यासाठी छोट्या जहाजाचा सहारा घ्यावा लागतो याच मध्ये पासपारटूट व फॉग वेगळे होतात व शांघाय ला परत भेटतात. शांघाय वरून ते सगळे कर्नाटिक बोट पकडतात सॅन फ्रान्सिस्को ला पोहचतात. आगगाडी चा प्रवास चालू होतो त्या गाडीवर रॉकी माऊंटन पार करताना रेड इंडियन लोक हल्ला करतात. हल्ल्यामध्ये रेल्वे चा चालक बेशुद्ध होतो प्रवासी घाबरतात व पॅसेपारटूट जीवाची बाजी लावून डब्बे व इंजिन वेगळं करतो त्यातच रेड इंडियन लोक पॅसेपारटूट ला घेऊन जातात फॉग जवानांच्या मदतीने त्याला सोडवायला जातो आवडा दोघांची वाट पाहत तिथेच थांबते आणि तिला कळत की तिला फॉग सोबत प्रेम झालाय तिला त्याची कलज्ज वाटू लागते व ते दोघे परत येतात. नंतर ते लिव्हरपूर ला येतात तिथून एक न्यूयारक ला जायला होती घेतात पुन्हा या सगळ्या प्रवासात संकट मात्र फॉग चा पिच्छा सोडत नसतात इंधन संपत व नाईलाजाने जहाज कापून त्याच लाकूड इंधन म्हणून वापराव लागत. तिथं गेल्यावर फिक्स फॉग ला अटक करतो परंतु त्याला कळत चोर 3 दिवसा पूर्वीच पकडल्या गेलेत. तिथून पुन्हा आगगाडीच्या प्रवास करत 80 दिवसात फॉग लंडन पोहचतो परंतु वेळेच्या 15 मिनिटे उशिरा व पेज हरतो दुसर्या दिवशी आवडा त्याला सांगते की ती त्याच्या वर प्रेम करते पण आता फॉग कडे काहीही रक्कम शिल्लक नसते पण दुसऱ्याच दिवशी पॅसेपारटूट त्याला सांगतो की आपण पेज जिंकलो आपण 79 दिवसातच लंडन ला परत आलो फॉग ने स्थानिक वेळे नुसार घड्याळात बदल केलेला नसतो त्यामुळे त्याच घड्याळ 24 तास पुढे चालत असत. अंतरराष्ट्रिय वार रेषा ओलांडताना वेळेत व दिवसात बदल होतो.
@संदीप गुंडे

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
सचित्र मराठी वाचनमाला
लेखक : ज्यूल्स व्हर्न
अनुवाद : सुभाष भेंडे
मूल्य : 17.50 ₹
Cover

द_अल्केमिस्ट _ पाउलो कोएलो

#द_अल्केमिस्ट _पाउलो कोएलो
कॉलेजमध्ये Raman Karde सरांनी या पुस्तकांबद्दल सांगितल होत तेंव्हा पासून हे पुस्तक कधी एकदा वाचतो अस झालेल.
पुस्तकाच्या लेखकाच्या जीवनातील खडतर प्रवास आणि त्यांच हे पुस्तक दोन्ही गोष्टी मनाला भावल्या आणि माझ्या best of favorite च्या यादीत पुस्तक जाऊन बसल.
पुस्तकातील नायक एक मेंढपाळ आपल्या स्वप्नाच्या शोधात कशा प्रकारे पाछडलेला असतो आणि त्या साठी त्याने केलेल्या प्रवासच वर्णन या पुस्तकात लेखकान केल आहे. 
आयुष्य जगत असताना आपण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कुठ तरी तडजोड करत आपल्या स्वप्नांचा विचार करण सोडतो पण मेंढपाळ आपल्या स्वप्नाच्या शोधत निघतो भलेही कितीही संकट आली तरीही.. चोरट्यानी लुटल्यांनातर आणि सगळं शून्य झाल्यानंतर शुद्ध पुन्हा नव्याने काचेच्यासामानाच्या दुकानातून सुरुवात करतो आणि पुन्हा काही दिवसांनी स्वप्नाच्या दिशेने आगेकूच करू लागतो.
प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी पाहिजे असत पण त्यासाठी तो प्रयन्त करण सोडून देतो आणि उरलेल सगळं आयुष्य "मी जर ते केल असत तर" या भोवतीच फिरत.
पुस्तकातील काही छान ओळी
1) जेव्हा कुणी आपल भवितव्य साकार करण्यासाच्या प्रयत्नात असतो तेव्हा सगळ विशव त्याच्या मदतीला धावून जात.
2) जे आपल्याला हवं आहे ते मिळवायचं सामर्थ्य जर आपल्या अंगी असेल तर आपण कशालाच घाबरायच कारण नाही.
2) जगातला सगळ्या आश्चर्यकारक आणि सुंदर गोष्टी बाघट असताना आपल्या अस्तित्वाचा विसर पडू न देणे हेच आनंदीपणाच रहस्य आहे.
@संदीपगुंडे

मंगळवार, २७ जून, २०१७

किल्ले लहुगड, संभाजीनगर


             निसर्गाच देण आणि बांधिलकी जपत दर वर्षी गडवाड प्रवास सह्याद्रीच्या वतीने वृक्षारोपण केल जात
मी या वर्षी म्हणजे २०१६ च्या शेवटी आणि २०१७ च्या  सुरुवातीला गडवाट च्या संपर्कात आलेलो
तसा खूप दिवसा पासून गडवाट आणि त्यांच्या सर्व मोहिमा बद्दल वाचायचो आणि आपण हि या मध्ये सहभाग घ्यावा मनाशी ठरवलेलं. किल्ले  साल्हेर_ मुल्हेर च्या गडवाट च्या ट्रेक ला हजेरी लावली आणि एक नवीन प्रवास चालू झाला.
                                              गडवाड निसर्ग संवर्धन मोहीम 
            वृक्षारोपण करण्यासाठी म्हणून किल्ले लहुगड, संभाजीनगर ची निवड करन्याय आली
२५ जून २०१७ रोजी नेहमी प्रमाणेच माझ्या प्रत्येक ट्रेक चा हक्काचा पार्टनर योगेश आणि त्याची bike
निघालो. 
    रस्त्यात नेहमी योगेश च्या bike चा खुराक आणि आमचा हि चोक या ठिकाणी झाला,
ते म्हणतात ना जे चुकत नाहीत ते ट्रेकर कसले आणि त्याची प्रचिती मला पुन्हा आली 
 लहुगड ला जाताना गुगल भाऊ मॅपवले नि माती खाली आणि आम्ही एका डोंगरावर जाऊन पोहोचलो, मी फुल टेंशन मध्ये आपल्याला उशिर झाला,होतोय आणि तितक्यात योगेश ला देवी च मंदिर दिसलं आणि त्याने गाडी मंदिरा पाशी थांबवलि आणि गेला दर्शन घ्यायला,मी तो पर्यंत मंदीरापाशी लावलेला बोर्ड वाचला आणि  कळलं कि आम्ही वाघोळा देवस्थान पाशी आहोत. पुढे रस्ता  मिळेल या आशेवर गाडी चालत राहिली पण शेवटी पावसाचे दिवस समोरचा कच्चा रास्त बंद मग काय गाडी फिरफून पुन्हा निघालो  वाघोळा गावा कडे... 
याच देवीच्या डोंगरावर आम्ही चुकलेली... प्रवास 
 वाघोळा पासून नांद्रा गाव आणि गावातून दिसणारा लहुगड. आता मला कधी गडावर जातोय आस झालेल 
शेवटी लहुगड दिसला आणि मी निश्चिन्त झालो. 
                         
लहुगड च्या शेजारी असणाऱ्या डोंगरावरून दिसणारा लहुगड
         
       लहुगड च्या शेजारी असणाऱ्या डोगरा वर कोरलेली एक गुफा. 

                  


गडावरील महादेव मंदिर 

 महादेव मंदिर, लहुगड



मंदिराच्या बाजूने पायऱ्या आहेत वर गेल कि काही पाण्याची टाकी दिसतात. पाणी पिण्यायोग्य नाहीअ  पण आमच्या उपयोगाला आल वृक्षारोपणाच्या.
पाण्याची टाके 
                           वृक्षारोपण करून गडाचा फेरफटका मारला हा किल्ला तसा छोटाच आहे पण आजची आपल इतिहासातील अस्तित्व टिकरून आहे. वरच्या बाजूला सीता नहानी म्हणून एक पाण्याचं ताक आहे आणि तिथेही एक मंदिर आहे.
सीता नहानी म्हणून असणार हे ठिकाण .. 



गडावरील आणखी एक पाण्याच टाक  मोती टाक  म्हणून इथं लिहिलंय आणि पाणी पिण्या योग्य आहे. 

शेवटी वृक्षारोपण झाल्यानंतर घेतलेला एक ग्रुप फोटो 



#lahugad #Lahugadfort #Lahugad


सुतोंडा (नायगावचा किल्ला)

सुतोंडा (नायगावचा किल्ला ) 1 मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्राच्या आणि मराठी मनाचा अभिमानाचा दिवस, महाराष्ट्राला लाभलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक...