रविवार, २३ डिसेंबर, २०१८

सोनेरी महाल - Soneri Mahal

परीक्षा संपली आणि कॉलेज ला एका  महिन्याची सुट्टी जरी मिळाली असली तरी मी ऑफिस च्या बदललेल्या वेळेमुळे ईच्छा असुनहि कुठेच जाऊ शकत नव्हतो आणि एका शुक्रवारच्या मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर वापर करण्यासाठी म्हणून रूम पासून काहीच अंतरावर असणाऱ्या सोनेरी महाल हि ऐतिहासिक वास्तू  बघायचा विचार माझ्या मनात आला आणि आणि त्या पुढच्या अर्ध्या तासात मी सोनेरी महालापाशी  होतो. 
प्रवेशव्दार (हाथीखाना )
औरंगाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या परिसरात आहे. महालाच्या आतील नक्षी,आणि चित्र सोन्याच्या पाण्याने रंगववाल्याने या वस्तूला सोनेरी महाल हा हे नाव प्राप्त झाले. औरंगाबाद मधील अनेक मौल्यवान ऐतिहासिक वास्तू पैकी एक असणारी हि वास्तू  बीबी का मकबरा मकबऱ्यापासून काहीच अंतरावर असली तरी इथं पर्यटकांची गर्दी जरा कमीच दिसते. ही वास्तु आता महाराष्ट्र पुरातत्व खात्याच्या अधीन असून प्रवेश शुल्क ३ रु. प्रति व्यक्ती आकारण्यात येते. 
सोनेरी महालाचे प्रवेशव्दाराचे दगडी असून भारदस्त आणि आजही भक्कम आहे, या व्दारास हाथीखाना असे म्हणतात. प्रवेशव्दारातून आत जाताच आपल्यलाला सोनेरी महाल आणि महालाची  शोभा वाढवणारी महालाच्या मागच्या बाजूने असणारी गोगाबाबा टेकडी दिसते. तर पुरातत्व विभागाने लावलेला सोनेरी महालाची माहिती देणारा फलक मला पहा मला पहा जणू असंच बोलतो.. त्या फलकावरील काही माहिती 
Soneri mahal,Aurangabad
प्रवेशव्दारातून आत जाताच दिसणार सुंदर दृश्य 
" औरंगजेबासोबत दख्खनमध्ये आलेल्या बुंदेलखंडातील सरदारने हा महाल बांधला. काही उपलब्ध पुराव्यांवरून असे कळते की शहाजहानने पहाडसिंग व झुंजारसिंग या दोन भावांना दख्खनला पाठवले होते. औरंगजेबाच्या काळात वेळोवेळी पराक्रम गाजवून पहाडसिंगने मुघल साम्राज्याला आपली निष्ठा दाखवून दिली. पुढील काळात त्याने औरंगाबाद येथील सोनेरी महालात वास्तव्य केले. या पुराव्याला अजून एक आधार असा की, सोनेरी महालाच्या बाहेर पहाडसिंगचा सावत्र भाऊ लाला हरदौल यांचे स्मृतिस्मारक आहे.
सोनेरी महाल हे स्मारक इ.स. १६५१ ते १६५३ च्या दरम्यान बांधले गेले असावे. ही इमारत बांधण्यासाठी त्यावेळी ५०,००० रुपये खर्च आला होता. १९३४ साली मूळ किंमतीचा अंदाज घेऊन हैदराबाद संस्थानाच्या तत्कालीन निजामाने हा महाल ओरछाच्या सवाई महेंद्र वीरसिंहदेव बहादुर यांच्याकडून २६,४०० रुपयांना विकत घेतला."
Soneri mahal,Aurangabad
सोनेरी महल 
मुख्य प्रवेशव्दारातून महालाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस बाग आहे तर रस्त्याच्या मधोमध लांबच लांब असा पाण्याचा पाण्याचा जलाशय दिसतो.
सोनेरी महालाच्या मुख्य चोथऱ्यावर जाण्या साठी पायऱ्या आहेत आणि त्यांचंच दोन्ही बाजूस दोन तोफा ठेवलेल्या आहेत तर चोथऱ्यावर तीन वेगवेगल्या प्रकारच्या तोफा बघायला मिळतात. 
या महालात आता वास्तू संग्रहालय सुद्धा आहे. मराठवाड्यातुन विविध ठिकाणावरून आणलेल्या मुर्त्या,वस्तू आपल्याला बघायला मिळतात. महालाच्या आत शिरताच प्रवेशशुल्क भरून उजव्या बाजूस लाकडी फळीवरील चित्रांच दालन आहे. यामध्ये  कृष्ण,राम महादेव,नेसर्गिक,झाड,फुल पक्षी याच्या पेंटिंग्स चा समावेश आहे. सगळी चित्र १७ व्या ते १८ व्या शतकातील आहेत, याच दालनाच्या पुढे काचेवरील चित्रांच दालन आहे. 
सोनेरी महलापासुन दिसणार हाथीखाना 

त्याच्या समोर आपल्याला सोनेरी महालातील मुख्य आणि या महालाचा मुख्य भाग बघायला मिळतो. महालातील सोनेरी रंगातील सुंदर नक्षी आणि मुघल स्थापत्य कलेचा नमुना असणाऱ्या कमानी बघायला मिळतात. हे बघून पुढं गेलं कि तांब्याच्या विविध वस्तू आणि मुर्त्या बघायला मिळतात. त्याच्या पुढे असणार दगडी शिल्पाचं दालन तर लक्ष वेधून घेत. या दालनातील काळ्या कातळातील शिल्प औढा ,हिंगोली येथील असून मला बाकी शिल्प जालना,सिल्लोड,चारठाणा, नगर, उस्मानाबाद येथील आहेत. यामधील चामुंडा देवीचे शिल्प मला अधिक आकर्षक वाटले. हे शिल्प परळी वेजेनाथ येथून आणले असून मूर्तीवरील नाजून काम विलोभनीय आहे.  विविध भाषेतीत शिलालेख सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. या दालनाच्या मधोमध एक लाकडी त्रिमुखी गणेशा बघायला मिळतात. डाव्या बाजूस विविध प्रकारच्या लहान लहान तोफांच दालन असून यामध्ये बंदुकीच्या आकाराच्या तोफा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाने एक वेळ नक्की या वास्तू भेट द्यायलाच हवी... 
शेवटी जाताना घेतलेला एक फोटो 
                                              

सुतोंडा (नायगावचा किल्ला)

सुतोंडा (नायगावचा किल्ला ) 1 मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्राच्या आणि मराठी मनाचा अभिमानाचा दिवस, महाराष्ट्राला लाभलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक...